भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या महाविजय-२०२४ कार्यशाळेला भिवंडीमध्ये सुरवात,चंद्रकांत पाटलांसमवेत मान्यवरांची उपस्थिती

44

ठाणे : भाजपने लोकसभेसाठी संघटनात्मक बांधणी करण्यास महाराष्ट्रात सुरवात केली आहे. याच अनुषंगाने भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या महाविजय-२०२४ कार्यशाळेला भिवंडीतील अंजुर येथे आज सुरूवात झाली. लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये लोकप्रतिनिधींना करण्यात येणार आहे.

याकार्यशाळेची सुरवात भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवीजी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, केंद्रीय मंत्री भागवतजी कराड, रावसाहेब दानवे पाटील, कपिल पाटील, आशिष शेलार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाली.

भाजपाच्या २०२४ मधील महाविजयाचा यावेळी सर्वांनी महासंकल्प केला‌ यावेळी करण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या कार्यशाळेला भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवीजी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, केंद्रीय मंत्री भागवतजी कराड, रावसाहेब दानवे पाटील, कपिल पाटील, आशिष शेलार यांच्यासह राज्यातील खासदार,आमदार आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.