अमरावती येथील ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाइल पार्कचा शिंदे – फडणवीस, गोयल यांच्या हस्ते शुभारंभ, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत मान्यवरांची उपस्थिती

20

मुंबई : देशात पीएम मित्रा अंतर्गत सात टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत आहेत. आज अमरावती येथील ‘पीएम मित्रा’ मेगा टेक्सटाइल पार्कचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, राजन सिंग, राहुल कुल,उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपिन शर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते.

अमरावती जवळ नांदगाव पेठ येथे हा पार्क उभारला जाणार असून त्यामुळे पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. एक हजार एकरावर होणारे टेक्स्टाईल पार्कमुळे दहा हजार कोटींची गुंतवणूक शक्य असून जवळपास एक लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमरावती जवळील नांदगाव पेठ येथे पंचतारांकित एमआयडीसी २८०९. ७८ हेक्टर एवढा परिसर आहे. उद्योगासाठी एकूण 107 भूखंड आरक्षण ठेवण्यात आले. सध्या रेमंड बीएचबी असे महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत, तर रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्प कार्यान्वित आहे.

हा पंतप्रधान मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असून ‘ फायबर तो कॉटन’ हे त्यांचे स्वप्न यामधून साकारले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

May be an image of 11 people, dais and text

Get real time updates directly on you device, subscribe now.