चंद्रकांत पाटील यांनी दिल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी काळ विधान भवन येथे भेटून शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी रायगडमधील आयर्शा इर्शाळवाडीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत यंदा हा वाढदिवस “सेवा दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या नेत्याला अत्यंत साध्य पद्धतीत का होईना पण शुभेच्छा द्याव्यात या उद्देशाने विधानभवन येथे भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलया असल्याचे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाची कोणत्याही माध्यमाद्वारे जाहिरात केली जाऊ नये असा आदेश पक्ष कार्यालयातून काढण्यात आला असून सेवा कार्या साठी योगदान द्यावे असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने करण्यात आले आहे. रायगड इर्शाळवाडी येथील घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.