पूर्व प्राथमिक ते १२वीपर्यंत शिक्षण प्रादेशिक भाषांमध्ये देण्याचा सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या निर्णयाचे चंद्रकांत पाटलांनी केले कौतुक

 

पुणे : सीबीएसई बोर्डाने काल आपल्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते १२वीपर्यंत प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. याबद्दलचे पत्रक देखील बोर्डाने प्रकाशित केले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत करत बोर्डाचे विशेष कौतुक केले आहे.

सीबीएसईने आपल्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक ते १२वीपर्यंत प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षण देण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. हे पाऊल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) उद्दिष्टे तर पूर्ण करेलच, यासह देशातील मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या प्रयत्नांनाही नवीन बळ देईल. आपणा सर्वांना माहित आहे की मुले त्यांच्या मातृभाषेत अधिक चांगल्यारितीने शिकतात आणि समजतात. त्यामुळे आता शिक्षण घेण्यासाठी भाषा अडथळा ठरणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की, तुम्ही अभ्यास करा, पुढे जा आणि तुमच्यासोबत राज्य आणि देशाला पुढे नेण्यात हातभार लावा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! असे मत पाटील यांनी आपल्या पोस्ट मध्ये व्यक्त केले आहे.

निश्चितच या निर्णयामूळे शैक्षणिक गुणवत्ता, तसेच विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढण्यास मदत मिळणार असल्याचे तज्ञ सांगत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!