मदनजींच्या निधनाने अनेक कार्यकर्त्यांनी पितृतूल्य व्यक्तिमत्त्व गमावले – चंद्रकांत पाटील
बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर कार्यवाहक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी यांचे मंगळूर मध्ये आज निधन झाले. गेल्या अनेक दिवसापासून प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. लहानपणापासूनच मदनदास देवी यांनी आपलं जीवन राष्ट्र सेवेसाठी आणि संघ कार्यासाठी व्यतीत केलं तर आयुष्यातील जवळपास 70 वर्षे हुन अधिक काळ त्यांनी संघाचा प्रचार आणि प्रसारासाठी काम केलं. संघाकडून ते भाजपचे राजकीय निरीक्षक म्हणूनही कार्य करत होते.
पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून “अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्वर्यू, पूर्व राष्ट्रीय संघटनमंत्री तथा रा. स्व. संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदासजी देवी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मदनजींनी माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांना राष्ट्र उभारणीच्या कामात जोडले होते. त्यांच्या निधनाने देशातील अनेक कार्यकर्त्यांनी पितृतूल्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांची साधी राहणी, उच्च विचार आणि कृतिशील व्यक्तिमत्त्व येणाऱ्या असंख्य पिढ्यांना आदर्श व प्रेरणा देत राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ! असे म्हणत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उद्या पुण्यामध्ये स्व. मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंकर करण्यात येणार असल्याचे समजते.