इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस वैयक्तिक १ लाख आणि लोकसहभागातून १० लाख रुपयांची मदत
मुंबई : मागील आठवड्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडुन देण्यात येणारी मदत तसेच जखमींच्या उपचारावर होणारा खर्च शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते.
यानुषंगाने या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. त्यानुसार पाटील यांनी आज विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण ११ लाखांचे धनादेश सुपूर्द केले. यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी वैयक्तिकरित्या १ लाख आणि लोकसहभागातून १० लाख रुपयांची मदत करण्यात आली.
यात अनुक्रमे संवेदना सोशल फाऊँडेशन-कोल्हापूर, सावली सेवा फाऊँडेशन-पुणे, पुनर्निमाण सोशल फाऊँडेशन-पुणे, युवा स्वराज्य प्रतिष्ठान-पुणे या संस्थांकडुन प्रत्येकी रुपये दोन लाख आणि आई प्रतिष्ठान-सोलापूर व चैतन्य प्रतिष्ठान-मुंबई या संस्थांकडुन प्रत्येकी एक लाख असे एकुण रुपये ११ लाखाचे धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहेत.
यावेळी मंत्री अनिल पाटील, शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले उपस्थित होते.
