विद्यमान सरकार हे बळीराजाचे हित जपणारे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

13

शिर्डी : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे करण्यात आला. अन्नदात्या शेतकऱ्याचे हित जपणाऱ्या महायुती सरकारचे लाख लाख धन्यवाद , असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते राज्याच्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील ८७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षाचा अर्थसंकल्प मांडताना शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेची घोषणा केली होती. यानुषंगाने आजच्या दिवशी महायुती सरकार आपल्या वचनबद्धतेची ग्वाही देते विद्यमान सरकार हे बळीराजाचे हित जपणारे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित करत असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री मोदी यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023 – 24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या योजनेला गती दिली. किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष मोहिम घेतली आणि 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाढविले. या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.