कसब्यातील नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून अल्पदरात दिवाळी फराळ वाटप

5

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या  मतदारसंघातील नागरिकांना जेवढ्या गोष्टी सोयीस्कर करून देता येतील तेवढ्या देण्याचा प्रयत्न करत असतात.  प्रत्येक व्यक्तीची दिवाळी गोड व्हावी, यासाठी त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे. कोथरूड , बाणेर यांनतर आता कसब्यातील नागरिकांसाठी त्यांनी अल्प दारात फराळ उपलब्ध केला आहे.

चंद्रकांत पाटील दरवर्षी अल्पदरात दिवाळी फराळ उपलब्ध करून देत असतात.  यंदाही त्यांनी  हा उपक्रम राबविला आहे.  कोथरुड प्रमाणे कसब्यातील नागरिकांचीही दिवाळी गोड व्हावी; यासाठी इथल्या ही नागरिकांना नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला आहे. कसब्यातील भारतीय जनता पार्टी नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून हा दिवाळी फराळ उपलब्ध करून दिला असून, असंख्य कसब्यातील नागरिकांनी दिवाळी फराळाचा लाभ घेतला.

Get real time updates directly on you device, subscribe now.