विधान परिषदेच्या माध्यमातून अभ्यासु आणि चळवळीतील नेतृत्व उदयास येत असते – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

29
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव स्नेह मेळावा आणि परिसंवाद कार्यक्रम विधानभवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विधान परिषदेच्या माध्यमातून अभ्यासु आणि चळवळीतील नेतृत्व उदयास येत असते. येथे अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते, नवीन कायदे पारित केले जातात आणि समाजाला न्याय मिळतो असे पाटील यांनी अधोरेखित केले. तसेच, सभागृहात सदस्यांना प्रेम, आपुलकी आणि आपले विचार मांडायला संधी मिळते. परिणामी, सदस्य अनुभवातून मोठा होतो त्यामुळे या सभागृहाची उंची मोठी आहे, असे मनोगत चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार,माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे आजी- माजी सदस्य, विधिमंडळाचे सचिव भोळे, विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.