‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन – चंद्रकांत पाटील

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेल्फी विथ मेरी माटी’ उपक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,यांसोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, 25 लाख विद्यार्थ्यांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ या उपक्रमात सहभाग घेतला. हे देशभक्तीचे उत्तम उदाहरण असल्याचे पाटील म्हणाले. गेल्या एक ते दीड महिन्यापासून राज्यातील सर्व विद्यापीठे महाविद्यालये, उच्च शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व इतर सर्व संबंधितांनी ‘सेल्फी विथ मेरी माटी’ अभियान यशस्वीपणे राबवून विश्वविक्रम केला आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या प्रसंगी विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर,राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, गिनीज बुक रेकॉर्ड भारतातील प्रतिनिधी ऋषिनाथ अँड्ज्युरिकेटर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!