मुंबई : मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आज दिवाळी निमित्त वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळांनी तयार केलेल्या कापडाचे प्रदर्शन व विक्री स्टॉल आयोजित करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या स्टॉलचे उदघाटन केले.
चंद्रकांत पाटील यांनी यांच्या हस्ते प्रदर्शन आणीन विक्री स्टॉलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली. उत्सुकतेने उत्पादनांची माहिती घेतली, आणि खरेदीही केली. यासोबतच चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग,उपयुक्त गोरक्ष गाडीलकर, उपसचिव श्रीकृष्ण पवार, उपसचिव श्रद्धा कोचरेकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.