विलेपार्ले येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुषमान भारत योजनेच्या कार्डचे वितरण

17

मुंबई : देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुषमान भारत योजना लागू केली आहे. या योजनेतील लाभार्थी कार्डधारकांना पाच लाखांपर्यंत औषधोपचार मोफत देण्यात येतात.

मुंबईतील विलेपार्ले भागातील वंचित नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नगरसेविका सौ. सुनीता राजेश मेहता यांनी पुढाकार घेत लाभार्थ्यांना आयुषमान भारत योजनेचे कार्ड काढून दिले. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी लाभार्थ्यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आयुषमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी पाटील यांनी आयोजकांचे स्तुत्य उपक्रम राबविल्याने कौतुक केले तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचं फायदा घ्यावा असे आवाहन देखील केले.

यावेळी स्थानिक नागरिक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

May be an image of 2 people, dais and text

Get real time updates directly on you device, subscribe now.