उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज भवानी पेठ भागातील आरोग्य सेवा शिबीरास हजेरी लावून प्रत्यक्ष केली पाहणी

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना भेटी दिल्या. आज संविधान दिनानिमित्त कसाब येथे भवानी पेठ परिसरात आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावत पाहणी केली.