‘मेरी माटी मेरा देश’ या उपक्रमाच्या माध्यमातून जोडलेल्या प्रत्येक स्वयंसेवकांप्रती चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता

24
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमा अंतर्गत सेल्फी विथ माटी या उपक्रमात भारतीय जनता युवा मोर्चा व महिला मोर्चा यांच्या प्रचंड सहभागाने व प्रयत्नाने चीनच्या विक्रमाला मागे टाकत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सेल्फीचा नवीन विश्वविक्रम रचण्यात आला. याबद्दलचा कृतज्ञता सोहळा पुण्यातील मॉडर्न कॉलेज महाविद्यालयात पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेरी माटी मेरा देश’ संकल्पाला बळ देण्यासाठी; उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेल्फी विथ मेरी माटी’ हा उपक्रम राज्यभरात राबविण्यात आला. याद्वारे घरातील मातीसोबतच राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या सेल्फीचे संकलन करण्यात आले. या उपक्रमाने चीनसारख्या देशालाही मागे टाकून विश्वविक्रम प्रस्थापित केला. महाराष्ट्राच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने ही घेतली. त्यामुळे या उपक्रमात सर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपक्रमाशी जोडलेल्या प्रत्येक स्वयंसेवकांप्रती चंद्रकांत पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधरजी मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष राजेशजी पांडे, भाजपा शहराध्यक्ष धीरजजी घाटे , आदित्य अभ्यंकर, दीपक हर्डीकर, डॉ संजय चाकणे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.