आलेगावकर माध्यमिक विद्यालयात श्रीक्षेत्र आळंदीहून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी सुरु करण्यात आलेल्या बस सेवेचा लोकार्पण समारंभ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर माध्यमिक विद्यालयात श्रीक्षेत्र आळंदीहून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसहभागातून एक खास बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. या बस सेवेचा लोकार्पण समारंभ आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
दरम्यान विद्यालयाच्या नवीन संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप देखील करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण प्रयोगशाळेची पाहणी केली. तसेच उपस्थितांशी संवाद देखील साधला.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंदजी छाजेड आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.