कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात दाखल झाले. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी प्रथम तुरंबे येथील गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले.
चंद्रकांत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बिद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी तुरंबे गावातील भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते लहुजी जरग यांच्या घरी भेट दिली. पाटील यांनी जरग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राम मंदिर आंदोलनात जरग यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी जरग यांना राम मंदिर उभारणीचे औचित्य साधून एक अनोखी भेट दिली. राम मंदिर परिसरातील माती, मंदिराची प्रतिकृती आणि राम चरित मानस मधील चौपाई भेट म्हणून स्वीकारताना जरग यांना गहिवरून आले.
Get real time updates directly on you device, subscribe now.