कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात बिद्री कारखाना निवडणूक प्रचारात सध्या पाटील हे सक्रिय आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पाटील यांनी कोल्हापुरात विविध ठिकाणी भेटी दिल्या. याचदरम्यान काँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
उचगावमधील कॉंग्रेसचे विजय गुळवे,विनायक जाधव,मच्छिंद्र सुतार,संभाजी पाटील या प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. चंद्रकांत पाटील यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, अनिल पंढरे,किरण घाटगे,अनिल शिंदे, एन डी वाईंगडे, राजू संकपाळ, उमेश पाटील, अभिजीत पाटील, दत्तात्रय तोरस्कर राजेंद्र चौगुले उमेश देशमुख, प्रवीण चव्हाण,सतीश मर्दाने, अनिल अवघडे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.