वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट येथे ‘शाश्वत तांत्रिक वस्त्रोद्योग नाविन्यपूर्ण साहित्य आणि यंत्रसामग्री विकास’ या परिषदेचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
मुंबई : माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट येथे ‘शाश्वत तांत्रिक वस्त्रोद्योग नाविन्यपूर्ण साहित्य आणि यंत्रसामग्री विकास’ या परिषदेचे शनिवारी आयोजन करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी प्रथम जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर या परिषदेचे उदघाटन करण्यात आले. पाटील यांनी यावेळी परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या विविध विभागांतील स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संचालक डॉ सचिन कोरे, डॉ नेहा मेहरा व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.