आगामी शैक्षणिक वर्षात एनईपीची सर्वांनी प्रभावी अंमलबजावणी करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

5

मुंबई : राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी पाटील यांनी राज्यातील एनईपी २०२० च्या अंमलबजावणीची सद्यस्थितीचा आढावा घेतला. आगामी शैक्षणिक वर्षात एनईपीची सर्वांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली.

या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, अकृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू, सहसंचालक प्रकाश बच्छाव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
एनईपी २०२० च्या या बैठकीत विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी (शैक्षणिक शुल्क) विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी आणि या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कुलगुरूंनी बहुमताने हा निर्णय मान्य केला. त्यामुळे यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात मोफत उच्च शिक्षण घेता येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.