अखंड भारताला कुटुंब समजून मोदीजी निस्वार्थपणे या देशाची सेवा करत आहे, त्यांच्या देशसेवेला आणि समर्पणाला सलाम – चंद्रकांत पाटील

5

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्षम नेतृत्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचत आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला घेता यावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे अभियान देशभरात राबविले आहे. याद्वारे मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील प्रत्येकाला दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या लाभार्थ्यांच्या संवादात मोदीजींच्या कार्यपद्धती विषयी संतोष असल्याचे चित्र पहायला मिळाले. अखंड भारताला कुटुंब समजून मोदीजी निस्वार्थपणे या देशाची सेवा करत आहे, त्यांच्या देशसेवेला आणि समर्पणाला सलाम, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. यावेळी भाजपचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.