राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी “५० व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उदघाटन संपन्न

6

नागपूर : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी “५० वा संसदीय अभ्यासवर्ग” सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपूरमधील विधानभवनात झाले. याप्रसंगी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

राज्यातील १२ विद्यापीठांतील सुमारे १०० विद्यार्थी व अधिव्याख्याते सहभागी होणार आहेत. विधानमंडळाच्या यु -ट्यूब चॅनल वरुन तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांद्वारे या व्याख्यानांच्या प्रसारणाचा लाभ जगभरातील प्रेक्षकांना घेता येत आहे.
नागपूर येथे होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने सन १९६४ पासून दरवर्षी ‘राज्यशास्त्र व लोकप्रशासन’ या विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयांबाबत एक संसदीय अभ्यासवर्ग आयोजित करण्यात येतो. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेला हा ५० वा संसदीय अभ्यासवर्ग आहे. या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून संसदीय शासन प्रणालीची विद्यार्थ्यांना जवळून ओळख करुन दिली जाते.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,  विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव  विलास आठवले इ. तज्ज्ञ मान्यवरांचे अभ्यासवर्गाला मार्गदर्शन होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.