नागपुरातील रेशीमबाग या श्रद्धास्थानाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले दर्शन

5

नागपूर : संघ परिवारातील प्रत्येक स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान म्हणजे नागपुरातील रेशीमबाग! संघ स्वयंसेवकांसाठी श्रद्धास्थानासह वैचारिक अनुष्ठानाच्या ऊर्जेचा केंद्र देखील आहे. विधीमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या श्रद्धास्थानाचे विधिमंडळातील सहकाऱ्यांसह दर्शन घेतले. तसेच सुयोग पत्रकार निवासस्थान येथे हिवाळी अधिवेशन निमित्त उपस्थित सर्व पत्रकार बांधवांची भेट देखील घेतली.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परम पूजनीय डॉ. हेडगेवार आणि परमपूजनीय श्री. गोवळलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शनाने एक नवी ऊर्जा मिळाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी यानंतर आज नागपूर येथील सुयोग पत्रकार निवासस्थान येथे हिवाळी अधिवेशन निमित्त उपस्थित सर्व पत्रकार बांधवांची भेट घेतली. यावेळी नविन शैक्षणिक धोरण, हिवाळी अधिवेशन कामकाज, राज्यातील सामजिक व राजकीय सद्यस्थिती इत्यादी विषयांवर मनमोकळेपणे चर्चा केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.