भावी पिढ्यांना महाराजांच्या कार्याशी जोडण्यासाठी ऋणानुबंध फाउंडेशन करत असलेल्या प्रयत्नांना सलाम – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

7

नागपूर : नागपूरमधील ऋणानुबंध फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज महाप्रतियोगिता स्पर्धा २०२३-२४ विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. या महाप्रतियोगितेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाटील यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या स्पर्धेत महाराजांचे भित्तीचित्र, शिल्पकला, छायाचित्र, चित्रकला, निबंध लेखन, कविता-गीत, लघुचित्र, गायन, वक्तृत्व या स्पर्धा इयत्ता ४ थी ते ७ वी, ८ वी ते १२ वी आणि खुला गट यांच्यासाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. पाटील यांनी म्हटले कि, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुरोगामी विचार आणि कार्य तरुणांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. यानुषंगाने भावी पिढ्यांना महाराजांच्या कार्याशी जोडण्यासाठी ऋणानुबंध फाउंडेशन करत असलेल्या प्रयत्नांना चंद्रकांत पाटील यांनी सलाम केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.