मुलांना शिवरायांचे कार्य समजावे; यासाठी आगामी काळात किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना गडकोट किल्ल्यांची मोहिम आयोजित केली जाईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीला लाभलेला बहुमूल्य ठेवा म्हणजे आपले गड-किल्ले! या ऐतिहासिक वास्तूंबद्दल नवीन पिढीमध्ये जागरुकता आणि आस्था निर्माण व्हावी तसेच नवीन पिढीमध्ये सांघिक भावना रुजावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, कोथरूड विधानसभा मतदार संघ यांच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांघिक किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात केली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पारितोषिक वितरित करण्यात आली.