तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

57

पुणे : तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संविधान दिनानिमित्त संविधान पूजन करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या प्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देखील करण्यात आले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्या निमित्ताने संविधान दिनाचे औचित्य साधत यंदाच्या तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

विद्येचे माहेरघर असलेले पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असून, राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यनगरीच्या या वैभवात पुणे पुस्तक महोत्सव भर घालत असून, वाचन संस्कृती बळकट करत आहे. या महोत्सवाची ख्याती आता दिल्लीतही पोहोचली आहे. पुणेकरांच्या उत्साहामुळे या महोत्सवाची व्यापकता व भव्यता वाढत असून, यंदाही हा महोत्सव नवा विक्रम प्रस्थापित करेल,’ असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

कार्यक्रमाला ज्येष्ठ संपादक व लेखक अरुण खोरे, ज्येष्ठ साहित्यिका व माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणाताई ढेरे, पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, महोत्सव संयोजक प्रसेनजित फडणवीस, आनंद काटीकर, बागेश्री मंठाळकर व डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.