मुलांना शिवरायांचे कार्य समजावे; यासाठी आगामी काळात किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना गडकोट किल्ल्यांची मोहिम आयोजित केली जाईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

13

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीला लाभलेला बहुमूल्य ठेवा म्हणजे आपले गड-किल्ले! या ऐतिहासिक वास्तूंबद्दल नवीन पिढीमध्ये जागरुकता आणि आस्था निर्माण व्हावी तसेच नवीन पिढीमध्ये सांघिक भावना रुजावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, कोथरूड विधानसभा मतदार संघ यांच्या माध्यमातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांघिक किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात केली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बुधवारी चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पारितोषिक वितरित करण्यात आली.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले कि, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ले हे प्रेरणा देणारे आहेत. लहान मुलांमध्ये शिवरायांचे विचार रुजावेत, त्यांना शिवरायांचे कार्य समजावे; यासाठी आगामी काळात किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना गडकोट किल्ल्यांची मोहिम आयोजित केली जाईल, अशी घोषणा किल्ले बनवा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात केली.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुलांना काही कल्पना सुचत असतील तर सांगण्यासाठी प्रोत्साहित केले. मुलांनी सुचविलेल्या कल्पना पूर्ण करणार यासाठी त्यांनी आश्वस्त देखील केले. यामध्ये पुण्यातील बाळगोपाळांना सुट्टीचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी “मामाच्या गावाला जाऊया” हा अभिनव उपक्रम राबवणार असल्याची घोषणा देखील पाटील यांनी किल्ले बनवा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात केली.
तसेच मकरसंक्रांतीचे औचित्य साधून लहान मुलांसाठी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाईल. यावेळी १० हजार पतंग मोफत मिळतील . मुलांनी केवळ पतंग उडविण्यासाठी यायचे आहे , असेही ‘किल्ले बनवा’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात त्यांनी आश्वस्त केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपा शहर अध्यक्ष धीरज घाटे,भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रदेश चिटणीस ॲड. वर्षा डहाळे, शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तर अध्यक्ष सचिन पाषाणकर, महिला मोर्चा अध्यक्षा कांचन कुंबरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, हर्षाली माथवड, वासंती जाधव, नगरसेवक दीपक पोटे, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, सचिन दळवी, अश्विनी ढमाले यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, किल्ला बनवा स्पर्धेतील सर्व स्पर्धक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.