राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून विठ्ठलवाडी येथील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत खिचडी प्रसादाचे वाटप

63

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त पुण्यात मोठ्या उत्साहात वातावरण होते. पुण्यातील विठ्ठलवाडी येथील विठ्ठलरुक्मिणी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. या मंदिराला ‘प्रती पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. अतिशय भक्तिमय वातावरणात पुणेकर पांडुरंगाच्या चरणी लीन झाले. जे वारकरी विविध कारणांमुळे पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, त्यांनी आपल्या गावातील मंदिरांमध्ये पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे, पुण्यातल्या विठ्ठलवाडी मंदिरात पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून येथे खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून त्यांनी देखील प्रसाद वाटप केले.

पुण्यातील हिंगणे खुर्द येथील विठ्ठलवाडी हे ठिकाण ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. येथे असलेले प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि शेजारील पुंडलिक मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. विठ्ठल नामाचा गजर अन् सेवाभावाची अनुभूती,हाच खरा अध्यात्मिक आनंद! चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमात सहभागी घेतला आणि विठ्ठलभक्तांची सेवा करण्याचा आनंद देखील लुटला.अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.