१०० व्या नाट्यसंमेलनासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याना उदघाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची केली विनंती

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांनी १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी सोलापूरची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्यात दि. २७ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री तथा १०० व्या नाट्यसंमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने चंद्रकांत पाटील यांनी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आमंत्रण दिले.