महाराष्ट्र डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या उदघाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारले
मुंबई : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे २९ जानेवारी रोजी होत आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व सांसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्वीकारले आहे.