कृतिशील, संवेदनशील, मायाळू, कनवाळू, लोकहितदक्ष मार्गदर्शकाच्या नेतृत्वात काम करण्याचे भाग्य आम्हाला लाभते आहे याचा सार्थ अभिमान – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

16
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रे नगर मध्ये प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ३० हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे लोकार्पण आज संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले.
याच सोहळ्यात अमृत २.० योजनेतील राज्यातील ४ महानगर पालिका आणि ३ नगर पालिकांच्या एकूण १ हजार २०१ कोटी रुपये खर्चाच्या ७ पाणीपुरवठा आणि एका मलनिस्सारण प्रकल्पांचे भूमिपूजन, पीएम स्वनिधी लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात निधी हस्तांतरण प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, विजयकुमार देशमुख, रे नगर हौसिंग फेडरेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम आणि असंख्य कामगार उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते गॅरंटी देऊन करूनही दाखवतात. याचा दाखला म्हणजे सोलापूर येथे वसावण्यात आलेली देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत! आज या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास संबोधित करताना मोदीजी भावुक झाले, त्यांचे अश्रू त्यांच्या ठायी असलेल्या संवेदनशीलतेचे प्रमाण आहे. अशा कृतिशील, संवेदनशील, मायाळू, कनवाळू, लोकहितदक्ष मार्गदर्शकाच्या नेतृत्वात काम करण्याचे भाग्य आम्हाला लाभते आहे याचा सार्थ अभिमान वाटतो, असं पाटील म्हणाले.
नरेंद्र मोदी आपले भाषण करत असताना भावुक झाले. ते म्हणाले कि, महाराष्ट्राचा गौरव वाढतो आहे तो महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि इथल्या प्रगतिशील सरकारमुळे होतो आहे. प्रभू रामाने आम्हाला नेहमी वचनपूर्तीची शिकवण दिली आहे. मला आज खूप आनंद होतो आहे कि सोलापूरमधल्या गरिबांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण झाला. मी ते काम पाहिलं तेव्हा वाटलं मलाही लहानपणी अशा घरात राहता आलं असत तर किती छान झालं असतं अस वाटलं. आज मी जेव्हा या गोष्टी पाहतो, तेव्हा मनात खूप आनंद होतो. हजारो कुटुंबांची स्वप्न जेव्हा साकार होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद माझी सर्वात मोठी पुंजी असतात असे म्हणत मोदींना अश्रू अनावर झाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.