देशातील ज्येष्ठ नागरिक संघ हे ऋषी संघ व्हायला पाहिजेत, ज्येष्ठांनी आपलं उर्वरित आयुष्य राष्ट्र निर्माणासाठी दिलं पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

8

पुणे : प्रभू श्रीराम यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपा कोथरुड सरचिटणीस गिरीश खत्री यांच्या माध्यमातून विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या राम कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांचे अनमोल विचार ऐकले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, रामचरित्राचा आदर्श त्यागाचा आहे. आपल्या ऋषीजनांची गुप्तहेर संघटना अतिशय महत्त्वाची होती. त्यांनीच हेतूपुरस्सरपणे वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांनी राज्य कसं करावं हे शिकवलं. देशातील ज्येष्ठ नागरिक संघ हे ऋषी संघ व्हायला पाहिजेत. ज्येष्ठांनी आपलं उर्वरित आयुष्य राष्ट्र निर्माणासाठी दिलं पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.