चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील तरुणांसाठी विशेष स्पर्धेची केली घोषणा… गेल्या नऊ वर्षांत मोदीजींनी केलेल्या विकासकामांच्या माहितीवर आधारित लेख लिहिण्याचे केले आवाहन

35

पुणे : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तरुणांशी संवाद साधला. गेल्या नऊ वर्षात भारताने संपूर्ण जगात नावलौकिक मिळविला आहे. यात १४० कोटी देशवासी असून तरुणांचे मोठे योगदान लाभले आहे असे मा. मोदीजींनी अधोरेखित केले. मोदीजी यांनी नवमतदारांशी साधलेल्या संवादाचे प्रक्षेपण पुण्यातील कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऐकले.

पाटील यांनी माहिती दिली कि,या संवादात आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या संकल्पनाम्यात कशाचा समावेश असावा हे तरुणांनी सांगावे, ते आमचे सरकार नक्की पूर्ण करेल, ही मोदींची गॅरेंटी आहे, असेही मोदींनी आश्वस्त केले. अखंड ऊर्जा आणि नव्या सृजनाची क्षमता असलेली युवा पिढी ही देशाची खरी ताकद आहे, अशी भावना याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
मोदीजींचा संबोधनाचा कार्यक्रम संपल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील तरुणांसाठी विशेष स्पर्धेची घोषणा केली. यात गेल्या नऊ वर्षांत मोदीजींनी केलेल्या विकासकामांच्या माहितीवर आधारित लेख लिहिण्याचे आवाहन केले. यावेळी दुष्यंत मोहोळ यांच्या सह भाजप युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि नवमतदार भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.