उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुणे शहर भाजपा माध्यम कक्षा’चे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न

95

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली असून, प्रचाराची रणनीती अधिक प्रभावी करण्यासाठी आज ‘पुणे शहर भाजपा माध्यम कक्षा’चे भव्य उद्घाटन करण्यात आले. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कक्षाचे उत्साहात लोकार्पण करण्यात आले.

या सोहळ्याला भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संदीप खर्डेकर, संजय मयेकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका निवडणूक काळात माध्यमांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी, पत्रकार परिषदांचे आयोजन तसेच पक्षाची भूमिका व विकासकामांची माहिती वेळेत पोहोचवण्यासाठी हे मीडिया सेंटर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अत्याधुनिक सुविधांसह साकारलेल्या या मीडिया सेंटरमध्ये निवडणूक काळात पत्रकार परिषदांच्या आयोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या आधुनिक माध्यम कक्षाच्या कार्यान्वयनामुळे पुणे भाजपची निवडणूक यंत्रणा आता अधिक वेगवान आणि ‘हायटेक’ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.