महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अशोक सराफ यांचे मनःपूर्वक अभिनंदन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

34
मुंबई : ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयातून निर्मळ विनोदाचे सादरीकरण  करणारे, चित्रपट आणि नाटकांतून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा अभिनेता म्हणजे अशोक सराफ.  अभिनय सम्राट म्हणून सुपरिचित असणाऱ्या अशोक सराफ यांनी आपल्या कसदार अभिनय आणि विनोद बुद्धीने अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. म्हणूनच, आजही रसिकप्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे. अशोक सराफ यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, हा पुरस्कार त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी दिलेल्या योगदानाची पोचपावती आहे. तरी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पाटील यांनी अशोक सराफ यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.