येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अधिकाधिक मुलींचे प्रवेश होतील, यासाठी विशेष अभियान राबवावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

महा-स्वयंम, ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म, नवीन क्रेडिट अभ्यासक्रम अंमलबजावणी आणि स्थिती व स्वायत्त महाविद्यालयासमोरील अडचणी, ई-समर्थ प्लॅटफॉर्म अंमलबजावणी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणीसाठी अहवाल, उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून राज्य शासनाच्या विविध विभागात इंटर्नशिप धोरण आणण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव येणार आहे. त्याची अंमलबजावणी करणे, तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील संस्थात्मक इंटर्नशिप धोरण आणि विभागांसाठी इंटर्नशिप धोरण अंमलबजावणी करणे, राज्यातील विद्यापीठांसाठी एकत्रित समान शैक्षणिक वेळापत्रक ठेवणे, शैक्षणिक वर्षात फक्त एकदाच दीक्षांत समारंभ आयोजित करणे, ‘युजीसी’च्या नियमांनुसार नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी कॉलेज ॲम्बेसेडरची नियुक्ती करणे, विद्यापीठस्तरावर सेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी, विद्यार्थी तक्रार निवारण मंच स्थापन करणे, महाविद्यालयीन स्तरावर महिला निवारण मंचाची स्थापना, प्रत्येक विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे बळकटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज चरित्रावरील अभ्यास शिबिरांचे आयोजन करणे अशा महत्वपूर्ण विषयांबाबत सविस्तर चर्चेद्वारे सादरीकरण करण्यात आले.
विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र डिजीलॉकर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच पदवी प्रमाणपत्र वापरता येईल. अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. दरम्यान सुकाणू समितीचे सदस्य अनिल राव यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण केले.