डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विकास कामासाठी पुरेसा निधी देणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

44

रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सवाचे मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयामार्फत आयोजित विविध विकास उपक्रमांचा देखील पाटील यांनी शुभारंभ केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या अंतर्गत विकासासाठी आवश्यक असे प्रस्ताव तयार करावेत. या सर्व प्रस्तावांना शासनस्तरावरून मंजुरी देण्यात येईल. तसेच विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी  चंद्रकांत  पाटील यांनी येथे केले.
यावेळी मार्गदर्शन चंद्रकांत पाटील म्हणाले की, तंत्रशास्त्र विद्यापीठाचे महत्व खूप मोठे आहे.  पुढीलवर्षी विद्यापीठांतर्गत किमान 3 हजार विद्यार्थी जगातल्या वेगवेगळया देशात पाठविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे 25 वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा येथे घेण्यात आली याबद्दल मनस्वी आनंद होत आहे. खेळामध्ये सर्वांनी एकमेकांना समजावून घेणे आवश्यक असते.  सर्व खेळाच्या मैदानासाठी आवश्यक असलेला निधी देण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न केला जाईल.  मुलींच्या वसतिगृहासाठी तसेच खेळांच्या मैदानासाठी आवश्यक निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.  डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे एक आदर्श विद्यापीठ व्हावे, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत असेही पाटील यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती जोपासावी व चालना देवून येथे राष्ट्रीय स्तरावरचे क्रीडांगण तयार करावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य व राष्ट्रीय स्तरीय खेळ येथे आयोजित करता येईल.

यावेळी क्रीडा संकुलातील फुटबॉल, खो-खो व कबड्डी मैदान, मुलींचे वसतिगृह, नूतनीकृत सभागृहाचे उद्घाटन तसेच कार्यशाळा इमारतीचे भूमिपूजन पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण व विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे यांसह विविध महाविद्यालयांचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.