भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या “भव्य नाईट व्हॉलीबॉल या स्पर्धेस स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : “नमो चषक २०२४” अंतर्गत दि १४ आणि १५ फेब्रुवारी अशी दोन दिवसीय “भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेस स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद लाभला असल्याचे कोथरूड मतदार संघाचे आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं कि, नवोदित खेळाडूंच्या सहभागाने हि स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग नोंदवला. उत्तर मंडल युवा मोर्चाचे सरचिटणीस निलेशजी सायकर, कोथरूड युवा मोर्चाचे सरचिटणीस सोहम मुरकुटे, कोथरूड युवा मोर्चाचे उपाध्यक्ष कौशल टंकसाळी व अवधूत गायकवाड यांनी स्पर्धेचे संयोजन केले त्याबद्दल त्यांचे पाटील यांनी आभार मानले.
स्पर्धेस पुणे शहर सरचिटणीस पुनीतजी जोशी, दक्षिण मंडलाचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला,उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका प्रीतीताई कळमकर,स्वप्नाली सायकर,उपाध्यक्ष भा.ज.पा.गणेशजी कळमकर,प्रल्हादजी सायकर,आकाश दादा बालवडकर,मयुरेश बालवडकर,सचिन दळवी,प्रमोद कांबळे,सरचिटणीस कोथरूड दक्षिण मंडल दिपक पवार,गिरीश खत्री व आदी मान्यवर उपस्थित होते.