चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटर तर्फे राजा माने यांचा गौरव !

अभिषेक बच्चन, गोविंदा,अरबाज खान,मिका सिंग,रविना टंडनची उपस्थिती

मुंबई : येथील चिल्ड्रन्स वेल्फेअर सेंटरच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष आणि फ्री प्रेस जर्नल व दैनिक नवशक्तीचे समूह राजकीय संपादक राजा माने यांचा सेंटरचे प्रमुख अजय कौल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तब्बल ४३ वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेच्या ४१व्या वार्षिक स्नेहसोहळ्यात सहा हजार विद्यार्थी-पालकांच्या उपस्थितीत मानपत्र, स्मृतिचिन्ह व शाल-श्रीफळ देवून राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव करण्यात आला.यावेळी ख्यातनाम अभिनेते अभिषेक बच्चन, गोविंदा, अभिनेत्री रविना टंडन, प्रसिद्ध गायक मिका सिंग, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष संजय भैरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!