पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भोसले यांची नियुक्ती?

20

पिंपरी चिंचवड : वाकड येथील १५०० कोटी रुपयांचा टीडीआर प्रकरणावरुन पिंपरी-चिंचवड शहराची राज्यभरात बदनामी झाली आहे. या प्रकरणात राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. आयुक्त सिंग यांनी मनमानीपणे घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांकमध्ये प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला असून, त्यांना अभय दिल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांना फटका बसेल, अशी शंका सेना-भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ‘‘भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा तीनही पक्षांना सोबत घेवून काम करेल, असा अधिकारी आपण देवूया… तुम्ही नाव सूचवा…’’ असे आश्वासित केल्या बोलले जाते.

विशेष म्हणजे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नावाबाबत चर्चा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यातील किन्हई येथील रहिवाशी असलेले आणि सातारा येथील सैनिक स्कुलचे माजी विद्यार्थी डॉ.राजेंद्र भोसले यांनी सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि नवी मुंबई अशा ठिकाणी सेवा बजावली आहे. राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सेनेतील बड्या नेत्यासोबत भोसले यांचा सलोखा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपा-सेनेच्या स्थानिक नेत्यांनी डॉ. भोसले यांची पिंपरी-चिंचवडमध्ये आयुक्तपदी नियुक्ती करण्याबाबत खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे आणि आमदार अश्विनी जगताप यांच्यात एकमत झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकर डॉ. राजेंद्र भोसले यांची पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागेल, अशी शक्यता आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.