सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे काल सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सोलापूरमधील सरकोली ते शंकरराव दरम्यानच्या रस्त्याचे भूमिपूजन केले.
पाटील यांनी माहिती दिली कि, पायाभूत सुविधा या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा कणा आहेत, म्हणूनच मोदी सरकारने कायम पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. देशाच्या अर्थसंकल्पातही पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सोलापूरमधील सरकोली ते शंकरराव दरम्यानच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या दळणवळणाला गती मिळणार असून अनेक गावे विकासाच्या प्रवाहाशी जोडले जातील असा विश्वास याप्रसंगी पाटील यांनी व्यक्त केला.
Get real time updates directly on you device, subscribe now.