वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न

पुणे : आज पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

आजच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन, घोरपडी येथील पुणे-सोलापूर रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण, घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाईनवर नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन, महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत वारजे येथे बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण तसेच वारजे येथील नवीन डी.पी. रोडचे भूमिपूजन इत्यादी कामांचा यात समावेश होता.
वारजे येथे उत्तम दर्जाचे पोलीस स्टेशन उभारण्यात येईल, त्यासाठी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी दूर होईल. पुणे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याने या भागाच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आ.भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!