लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आज अकोल्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधला संवाद…  एकजुटीने पुन्हा कमळ फुलविण्याचे केले आवाहन

100

अकोला : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपकडून आता जोरदार प्रचाराला सुरवात झाली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज भाजपाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात अकोला जिल्ह्यातील भाजपा निवडणूक प्रचार कार्यालयास त्यांनी भेट दिली.

चंद्रकांत पाटील यांनी आज अकोल्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आणि एकजुटीने पुन्हा कमळ फुलविण्याचे आवाहनही केले. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह सर्वांसाठीच ऊर्जादायी होता.
यावेळी पाटील यांनी रुपेश जयस्वाल यांच्या अकोला येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी जैस्वाल कुटुंबीयांनी अत्यंत अगत्याने स्वागत केले. सर्वांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. रुपेशजींचे आदरातिथ्य सुरेख होतेच, पण आपलेपणा विशेष भावला असल्याचे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.