लोकसभेच्या पुणे मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती दौऱ्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे दौऱ्यावर आहेत. आज पाटील यांनी शिवाजीनगर तसेच पर्वती मतदार संघातील महायुतीची समन्वय बैठक घेतली.