पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घ्यावेत – मंत्री चंद्रकांत पाटील

22
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सध्या चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यातील मतदारसंघांना भेट देत मार्गदर्शन करत आहेत. अकोला, बारामती दौऱ्यानंतर सध्या ते पुण्यातील मतदारसंघात जाऊन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. बुधवारी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची खडकवासला विधानसभा मतदारसंघाची समन्वय बैठक संपन्न झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या या बैठकीत पाटील म्हणाले कि, सर्व समाजघटकांचा विकास हे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी तसेच मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन पाटील यांनी याप्रसंगी केले.
अजित पवार यांनी यानिमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच काही महत्त्वपूर्ण सूचना देखील केल्या.
एकूणच महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एक दिलाने संपूर्ण ताकदीनिशी काम करत बारामती लोकसभेमध्ये महायुतीचा महाविजय करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी, असे निर्देश या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांसह महायुतीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.