चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभेच्या हातकणंगले मतदार संघाची आढावा बैठक संपन्न

115
कोल्हापूर : आगामी लोकसभा निडणुकीची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. यानिमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लोकसभेच्या हातकणंगले मतदार संघाच्या आढावा बैठकीस हजेरी लावली.
 
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत यावेळी निवडणुकीसह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा मानस यावेळी सर्वांनी व्यक्त केला. मोदीजी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी लोकांमधून मिळणारा प्रतिसाद पाहून अतिशय आनंद झाला असल्याचे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कुशल नेतृत्वात ‘अब की बार 400 पार’ हा संकल्प पूर्ण करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊया, असा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, सुरेश हळवणकर, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने, मकरंद भाऊ देशपांडे, विक्रम पावसकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, शौमिका महाडिक, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, निशिकांत दादा पाटील, संजय पाटील, बाबासाहेब पाटील, सुरेश पाटील, राजवर्धन निंबाळकर, रवींद्र माने, आनंदराव पवार, योगेश जानकर, उत्तम कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.