पुणे लोकसभेतील महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी महायुतीचा पदाधिकारी मेळावा बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न
मुरलीअण्णांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी योग्य समन्वय ठेवण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला. शिवसेना आणि भाजपची युती २५-३० वर्षे जुनी आहे, त्यात आता अजितदादांची राष्ट्रवादी सहभागी झाली आहे. आपण सर्वांनी मिळून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचे असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय मशीलकर,शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव,पर्वतीच्या आमदार माधुरीताई मिसाळ, शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक,हडपसरचे आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपकभाऊ मानकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले, रिपब्लिकशन पार्टीचे अध्यक्ष संजय सोनावणे, परशुराम वाडेकर, शिवसेनेचे अजय बापू भोसले, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर व अन्य नेते उपस्थित होते. या मेळाव्याचे यशस्वी व्यवस्थापन किरण साळी व सुशील मेंगडे यांनी केले.