जनता आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजपा-महायुतीला विजयी करतील – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :  कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज हातकणंगले येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. सातत्याने विकासाची ओढ असलेली कोल्हापूर मधील जनता आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजपा-महायुतीला विजयी करतील असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची निवडणूक असून देशाला दिशा देणारी आणि प्रगतीपथावर नेणारी अशी ही निवडणूक आहे. त्यामुळे अत्यंत विचारपूर्वक मतदान करण्याची गरज आहे असे मत यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, सातारा संपर्कप्रमुख शरद कणसे तसेच महायुतीचे घटकपक्ष असलेले शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाई आणि रासपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

error: Content is protected !!