कोल्हापूरकरांचा हा जल्लोष महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करेल, असा ठाम विश्वास वाटतो – चंद्रकांत पाटील

3
कोल्हापूर :  लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी भव्य शक्तिप्रदर्शनात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी नऊ वाजल्यापासूनच हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघातून कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली होती. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता.  या वेळी बहुसंख्येने उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांमधील प्रचंड उत्साह पाहून संजयजी मंडलिक आणि धैर्यशीलजी माने यांचा विजय निवडणुकीपूर्वीच कोल्हापूरकरांनी निश्चित केल्याचा जणू प्रत्ययच आला असल्याचे पाटील यांनी म्हटले. कोल्हापूरकरांचा हा जल्लोष महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करेल, असा ठाम विश्वास वाटत असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले.

यावेळी खासदार धंनजय महाडिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ , आमदार, मंत्री शंभूराजे देसाई, आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, शिवसेनेचे नेते रामदास कदम, जनसुराज शक्तीचे अध्यक्ष विनयराव कोरे, आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, ताराराणी आघाडीचे आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, के पी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष महेश जाधव, शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांसोबत इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.