चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर मधील करवीर तालुक्यातील कुर्डू येथे ग्रामपंचायत सदस्य सतीशकुमार पाटील यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

30

कोल्हापूर : उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी कोल्हापूर मधील करवीर तालुक्यातील कुर्डू येथे ग्रामपंचायत सदस्य सतीशकुमार पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी 106 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन सतबा पाटील यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी सरपंच अश्विनी सुतार, माजी सरपंच आनंदराव चौगले, राजाराम चौगले, गोविंद चौगले, आरपीआय आठवले गटाचे नामदेव, कोथळीकर,अशोक कांबळे,सूर्यकांत पाटील, मारुती पाटील,माजी उपसरपंच रंगराव पाटील, तुकाराम चौगले, रंगराव कांबळे, संतोष सुतार यांच्यासाह गावातील विविध सेवा संस्था, दूध संस्था व इतर संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.