पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विक्रमी मतांनी विजयी करा- चंद्रकांत पाटील

31
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथे आयोजित महायुती महामेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन या वेळी पाटील यांनी केले.

मराठा समाजामध्ये असणारा गैरसमज दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या गोष्टी यावेळी उलगडून सांगितल्या. काँग्रेस पक्षाकडून संविधान बदलणार असा गैरसमज पसरवण्यात येत आहे, मात्र संविधान बदलणार नाही, अशी खात्री दिली, तर आतापर्यंत 107 वेळा संविधान दुरुस्ती केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मोदी सरकारने आंबेडकरांचे पाच ठिकाणे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केली तर मोदी सरकार संविधान बदलेल का असा सवाल त्यांनी केला. मोदी सरकार स्ट्रॉंग करण्यासाठी आपकी बार 400 पार हा नारा देण्यात आला आहे त्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देण्याचे चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले.
खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हलवणकर, गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन मा. माधवराव घाटगे, जिल्हा परिषद सदस्य मा. अशोकराव माने, मा. विजय भोजे, भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजवर्धन नाईक निंबाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मा. सतीश मलमे, माजी जिल्हाप्रमुख भाजपा मा. हिंदुराव शेळके, यासोबतच महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.